रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 20 मार्च 2019 (09:17 IST)

काँग्रेसची नऊ उमेदवारांची यादी प्रसिद्ध

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली नऊ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये केरळमधील दोन आणि महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांच्या यादीत माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड, चारुलता टोकस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 
 
काँग्रेसने \ जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये नंदूरबार येथून के. सी. पडावी, धुळे येथून कुणार रोहिदास पाटील, वर्धा येथून अॅड. चारुलता टोकस, यवतमाळ-वाशीम येथून माणिकराव ठाकरे, मुंबई दक्षिण मध्य येथून एकनाथ गायकवाड, शिर्डी येथून भाऊसाहेब कांबळे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून नविनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र सर्वांचे लक्ष लागलेल्या नांदेड आणि हिंगोली या मतदारसंघातील उमेदवारांची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत.