शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मार्च 2019 (17:10 IST)

मी अजून राजीनामा दिला नाहीये - राधाकृष्ण विखे पाटील

सुजय विखे पाटील यांनी कॉंग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला आणि त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत सापडले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला नाही, असा खुलासा विखे पाटील यांनी केला आहे. राधाकृष्ण विखे-पाटलांनी राजीनामा द्यावा, असा दबाव काँग्रेसमधून त्यांच्यावर वाढत आहे. सुजय विखे-पाटलांनी भाजपाची वाट धरल्यानं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसला, पण राधाकृष्ण विखेंचंही हे मोठं अपयश मानलं जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होते आहे.
 
या पार्श्वभूमीवर ते विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार असल्याची राजकीय जोरदार चर्चा असून, प्रसारमाध्यमांमध्ये राधाकृष्ण विखे-पाटलांच्या राजीनाम्यासंदर्भात उठलेल्या अफवांना त्यांनीच पूर्णविराम देत स्पष्टीकरण दिले आहे. मी अजून तरी राजीनामा दिलेला नाही, असा खुलासा राधाकृष्ण विखे-पाटलांनी केला आहे. सुजय विखे-पाटलांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटलांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी नगर लोकसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने प्रचार करणार नाही आणि मुलगा सुजय विखे पाटील याचाही प्रचार करणार नाही, अशी घोषणा केली होती.

लोकसभेसाठी अहमदनगरच्या जागेवरून आघाडीत निर्माण झालेला तिढा सुटत नाही हे पाहुत वैतागलेल्या सुजय विखे पाटील यांनी भाजापमध्ये प्रवेश केला होता. त्यावरून राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर स्वपक्षीयांकडूनच टीका करण्यात येत होती. त्यामुळे आता कॉंग्रेस अंतर्गत विरोध पाहून विखे पाटील राजीनामा देतील असा कयास लावला जातो आहे.