शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 9 एप्रिल 2019 (09:20 IST)

भाजपाच्या संकल्पपत्रावर जनता विश्वास ठेवणार नाही - नवाब मलिक

भाजपाने आज जाहीर केलेले संकल्पपत्र हा निव्वळ चुनावी जुमला आहे. त्यामुळे त्यावर देशातील जनता विश्वास ठेवणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपाच्या संकल्पपत्रावर केली आहे. नवीन आश्वासनांची खैरात करून अधिकची ७५ आश्वासने देण्यापेक्षा मागील जाहीरनाम्यातील किती आश्वासने पूर्ण केली त्याची माहिती दिली असती तर बरं झालं असतं, असा टोला मलिक यांनी लगावला. दोन कोटी नोकऱ्या, हमीभाव, नवीन स्मार्ट शहरे, राम मंदिर अशा मागील जाहिरनाम्यातील अनेक आश्वासनांची यावेळी मलिक यांनी आठवण करून दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेस ने सुद्धा त्यांचा स्वतःचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. सध्या सर्वच पक्ष सोशल मिडीयावर एकमेकांवर जोरदार टीका करत आहे.