शनिवार, 9 डिसेंबर 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 10 एप्रिल 2019 (17:14 IST)

इंदिरा गांधी यांच्यावर आधारित वेब सीरिजमध्ये विद्या बालन!

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री विद्या बालन म्हणाली की ती देशाची पहिली आणि एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधीं यांच्यावर आधारित वेब सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळविण्याचा प्रयत्नात आहे. मंगळवारी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान मीडियाशी बोलताना विद्याने इंदिरा गांधींवर आधारित वेब सीरिजमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
 
मीडिया अहवालानुसार या वेब सीरिजचे निर्माण तिचे पती सिद्धार्थ रॉय कपूर करतील. विद्या म्हणाली, "मी इंदिरा गांधींच्या जीवनावर आधारित वेब सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या मी प्रयत्न करीत आहे, पुढे काय होते ते पहा." ती म्हणाली, "मी असं अनुभव करत आहे की एखाद्या वेब सीरीजशी जुळल्यावर खूप काम करावं लागतं. एका चित्रपटाच्या तुलनेत वेब सीरीजमध्ये काम करताना बरेच लोक स्वत: शी कनेक्ट करतात. त्यामुळे यात खूप वेळ देखील लागतो."