सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 10 एप्रिल 2019 (09:08 IST)

मोदींचा बायोपिक ३८ देशांमध्ये प्रदर्शित होणार

आनंद पंडीत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील बायोपिक सध्‍या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मात्र पंडीत यांनी हा  बायोपिक केवळ भारतातच नाही, तर इतर देशांतही प्रदर्शित करण्याची योजना आखली  आहे.
 
आनंद पंडीत यांनी सांगितले आहे की, “पीएम नरेंद्र मोदींच्या जीवनातील प्रवास जाणून घेण्यात केवळ भारतीय प्रेक्षकांनाच नव्हे तर संपूर्ण जगभरातील प्रेक्षकांना रस आहे. त्यामुळे आम्ही या चित्रपटाला केवळ देशभरातच नाही तर ३८ देशांमध्ये प्रदर्शित करण्याचे ठरवले आहे”. हा चित्रपट भारतातील १७०० स्क्रिन्सवर दाखवला जाणार आहे. परदेशांतही ३ भाषांमध्ये ६०० स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्याची योजना आम्ही करत आहोत. तर, दक्षिण भारतात हा बायोपीक २०० स्क्रिन्सवर दाखवला जाणार आहे असे त्यांनी सांगितले.