शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 2 जून 2018 (09:00 IST)

‘लैला मजनू’चा टीझर प्रदर्शित

एकता कपूरच्या आगामी ‘लैला मजनू’या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ही माहिती एकता कपूरने तिच्या ट्विटरवर दिली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी साजिद अली यांनी घेतली असून एकता कपूरच्या बालाजी मोशन्सअंतर्गंत हा चित्रपट साकार होणार आहे. तर या चित्रपटाची पटकथा इम्तियाज अली यांनी लिहीली आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने एकता आणि इम्तियाज अली एकत्रित काम करणार आहेत. हा चित्रपट २४ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.‘लैला मजनू’हा चित्रपट प्रेमकथेवर आधारित आहे.
 
प्रदर्शित झालेला हा टीझर केवळ ५७ सेकंदांचा असून यात मुख्य नायक आणि नायिकेचा चेहरा मात्र दाखविण्यात आला नाही. हा टीझर बर्फाळ डोंगररांगांमध्ये चित्रीत करण्यात आला आहे. तसेच चित्रपटामध्ये प्रेमकथा असण्याबरोबरच त्यात मैत्रीतील अतूट बंधनदेखील दाखविण्यात आलं आहे. मात्र अद्याप या चित्रपटातील मुख्य नायक आणि नायिकेच्या नावाचा खुलासा झालेला नाही.