गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 एप्रिल 2019 (14:24 IST)

रजनीकांतच्या ‘दरबार’ चा फर्स्ट लुक रिलीज

‘पेटा’ चित्रपट नंतर साऊथचे सुपरस्टार रजनीकांत दरबार या चित्रपटातून पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला येत आहे. या चित्रपटतील रजनीकांतचा फर्स्ट लुक रिलीज झाला असून या चित्रपटात रजनीकांत शिस्तबद्ध पुलिस अधिकाऱ्याची भूमिका निभविणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सुपरस्टार रजनीकांत आपल्या अनोख्या अंदाजामध्ये दिसून येत आहे. त्याचबरोबर पोस्टरमध्ये पोलीस विभागाचे प्रतिनिधित्व अनेक वस्तूंचे दाखविण्यात आल्या आहे. तसेच गेटवे ऑफ इंडिया सुद्धा दाखविण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शिक एआर मुरुगदास आहे. एआर मुरुगदास यांनी या चित्रपटाचे पोस्टर ट्विटवर शेयर केले आहे.