शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 28 जानेवारी 2019 (08:54 IST)

सौंदर्या दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार

सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या पुढील महिन्यात दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. व्यावसायिक आणि अभिनेता विशागन वनानगामुडी याच्यासोबत सौंदर्या ११ फेब्रुवारीला लग्न करणार आहे. चेन्नईमध्ये हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे.९ फेब्रुवारीपासून मेहंदी, संगीत अशा कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे.
 
सौंदर्या घटस्फोटीत आहे. तिला पाच वर्षांचा मुलगा देखील आहे. २०१० मध्ये सौंदर्यानं चेन्नईस्थित व्यावसायिक अश्विन याच्यासोबत लग्न केलं होतं मात्र या दोघांच्या वैवाहिक जीवनात वारंवार खटके उडत असल्यानं २०१७ मध्ये तिनं घटस्फोट घेतला. सौंदर्यानं अभिनयापेक्षा पडद्यामागे राहत या क्षेत्राशी आपली नाळ जोडली. तिनं दिग्दर्शनात अधिक रस घेतला.  सौंदर्यानं काही चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं आहे.