नंबी नारायण सारखा आर. माधवन दिसणार हुबेहूब वैज्ञानिक ..!
आर. माधवन यांनी दिग्दर्शित आणि अभिनय केलेल्या “रॉकेट्री: द नंबी इफेक्ट” या चित्रपटाच्या ट्रेलरने गेल्यावर्षी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते एवढच नव्हे तर दोन तासांपेक्षा कमी वेळेत युट्युब, फेसबुक आणि ट्विटरवर दहा लाखपेक्षा जास्त वियुज मिळाले होते. ह्या चित्रपटासाठी आर.माधवन खूप उत्सहित आहेत. चित्रपटाच्या स्क्रिप्ट वर माधवनने स्व:ताहा तीन ते साडेतीन वर्षे काम केले त्यात परफेक्ट दिसण्यासाठी लुक वर अडीच वर्षे घेतले.
“सलग दोन दिवस खुर्चीवर बसून राहणे फार कठीण होते. सुरुवातीला हे सगळे सोपे वाटले पण मला समजले कि ह्यात शारीरिक तणाव फार होतो आहे. मी साकारत असलेल्या पात्राचे वय ७०-७५ असे म्हणून माझ्यासाठी हा रोल एक आव्हान होते. नंबी ह्यांच व्यक्तिमत्व खूप चांगले व तेजमय आहे ह्यासाठीच मला त्यांचा रोलसाठी अडीच वर्षे लागले. कदाचित हा माझ्या चित्रपट कारकिर्दीतला सगळ्यात कठीण रोल आहे” असे अभिनेता आर. माधवनने म्हंटल . आर. माधवनने पुढे सांगितले “माझा लुक पाहून नंबी सरांचे हसू थांबतच नव्हते व त्यांना हा लुक फार आवडला सुद्धा. सेटवर मी आणि नंबी सर आम्ही दोघे एकसारखेच दिसत होतो.”रॉकेट्री: नंबी इफेक्ट हा चित्रपट इंग्रजी, हिंदी आणि तमिळ अश्या तीन भाषेत असेल आणि ह्याची शुटिंग भारत, प्रिन्सटन, स्कॉटलंड, फ्रान्स आणि रशियामध्ये केले आहे. २०१९मध्ये हा चित्रपट सर्वत्र जगभर रिलीज होणार आहे