शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 जानेवारी 2019 (09:10 IST)

हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचे निलंबन मागे

hardik pandya
कॉफी विथ करण शोमध्ये महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि सलामीवीर लोकेश राहुल यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. सुप्रिम कोर्टाने नेमलेल्‍या प्रशासकीय समितीने(CoA) पांड्या आणि राहुल वरील बंदी तत्काळ मागे घेतली आहे. दरम्‍यान, ५ फेब्रुवारी रोजी या प्रकरणावर सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे. 
 
हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांनी दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये उपस्थिती लावली होती. या शोमध्ये त्‍यांनी महिलांबाबत काही वादग्रस्त विधाने केली होती. या वक्‍तव्यामुळे त्‍या दोघांचेही भारतीय संघातून निलंबन करण्यात आले होते. दोघांनाही ऑस्‍टेलिया दौऱ्यातून परत बोलाविले होते.