संबंधित माहिती
- वायआरएफ कडून २५ जुलै रोजी 'वॉर २' ट्रेलर लॉन्च – ऋतिक रोशन आणि एनटीआर चा २५ वर्षांचा चित्रपट प्रवास साजरा होणार!
- प्रसिद्ध चित्रपट निर्माते राकेश रोशन रुग्णालयात दाखल, मानेवर झाली अँजिओप्लास्टी
- वॉर 2’च्या प्रमोशनमध्ये ऋतिक आणि एनटीआर एकत्र दिसणार नाहीत! YRF ची भन्नाट प्रचार युक्ती
- वायआरएफ आणि मोहित सूरी आणत आहेत 'सैयारा' मधील चौथं रोमँटिक गाणं 'हमसफर'
- "वॉर 2 मध्ये ऋतिकची मॅग्नेटिक उपस्थिती आणखी उठून दिसावी यासाठी मेहनत घेतली आहे!" – अनाइता श्रॉफ अदजानिया यांचा खुलासा
हृतिक- कियाराचे ‘वॉर 2’ या चित्रपटाचे पहिले गाणे ‘आवन जावन’ प्रदर्शित
यशराज फिल्म्सने वॉर 2 या बहुचर्चित चित्रपटाचा पहिला गाणं आवन जावन प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चाली सोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून ते रोमच्या ऐतिहासिक आणि मोहक रस्त्यांपर्यंतच्या लोकेशन्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
दिग्दर्शक अयान मुखर्जी म्हणाले,“या प्रेमगीतासाठी अशी पार्श्वभूमी हवी होती जी प्रेम, प्रवास आणि नात्यांची उर्जा दाखवू शकेल. दोन व्यक्ती प्रेमात आहेत आणि एकत्र जग पाहत आहेत – अशी भावना निर्माण करणारी लोकेशन म्हणून इटली निवडल्यावर मी खूप आनंदी होतो.”
कियारा अडवाणी म्हणाली, “इथे अगदी योग्य प्रमाणात ऊन आणि सुखद गारवा होता. मला इथेच थांबावं, आराम करावा आणि या थर्मल पूलमध्ये पोहत राहावं असं सतत वाटत होतं. हे एकदम स्वप्नवत आणि मनमोहक आहे.”
कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस म्हणाला ,“टस्कनीने आम्हाला कमालीचं सौंदर्य दिले आहे. इथलं रंगसंगतीचं दृश्य अचूक आहे. ही लोकेशन गाण्याला एक वेगळी उंची देते.”
अयान मुखर्जी यांनी रोममधील शूटिंगचा अनुभव शेअर करताना सांगितलं, “रोममध्ये गेल्यावर मला वाटलं की, कोलोसियम, स्पॅनिश स्टेप्स आणि ट्रेवी फाउंटन या आयकॉनिक जागांवर चित्रीकरण करणं आवश्यक आहे. या ठिकाणी शूटिंगसाठी परवानगी मिळवणं खूपच कठीण होतं, पण सुदैवाने सर्व काही जमून आलं आणि आम्ही त्या सर्व ठिकाणी शूट करू शकलो.”
त्यांनी पुढे सांगितले, “हे गाणं तयार करताना संपूर्ण टीममध्ये एक सकारात्मक ऊर्जा होती. हे एक फील गुड गाणं आहे. आम्हाला हे बनवताना खूप आनंद मिळाला आणि आम्ही प्रेक्षकांनाही तोच आनंद मिळेल अशी आशा करतो.”
आवन जावन या गाण्याच्या चित्रीकरणाचा व्हिडिओ येथे पाहा -
वॉर 2 या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केलं आहे आणि तो आदित्य चोप्रा यांनी निर्मित केलेला आहे. हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.
