बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 28 ऑगस्ट 2018 (17:18 IST)

भारताचे मिशन चंद्रयान-2 येत्या 3 जानेवारी, 2019 ला

भारताचे मिशन चंद्रयान-2 आता 3 जानेवारी, 2019 ला लॉन्च होणार आहे. लॉन्च झाल्यानंतर 40 दिवसात यान चंद्रावर पोहोचेल. इस्रोचे चेअरमन के. सिवान यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत माहिती दिली की, मार्च 2019 च्या आधी भारत 19 मिशन लॉन्च करणार आहे. यामध्ये चंद्रयान-2 चा देखील समावेश आहे. चंद्रयान-2 याच वर्षी अतंराळात जाणार होतं पण डिझाईनमध्ये काही बदल होणार असल्याने हे मिशन पुढे ढकलण्यात आलं. हे मिशन लॉन्च झाल्यानंतर भारत चंद्रावर पोहोचणारा चौथा देश बनणार आहे. याआधी अमेरिका, रूस आणि चीनने चंद्रावर आपले यान पाठवले आहेत. 
 
नव्या डिझाईनमुळे यानाचं जवळपास 600 किलो वजन वाढलं आहे. यान तयार झाल्यानंतर जेव्हा त्याची चाचणी केली गेली तेव्हा असं लक्षात आलं की, उपग्रह जेव्हा चंद्रावर उतरेल तेव्हा त्याचा काही भाग हा चंद्रावर उतरेल तेव्हा तो हलू लागेल. त्यामुळे या उपग्रहाचं वजन पुन्हा वाढवण्याची आवश्यकता भासली.