शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 28 ऑगस्ट 2018 (09:11 IST)

जैव इंधनावर चालणाऱ्या विमानाचे यशस्वी उड्डाण

भारतात पहिल्यांदाच जैव इंधनावर चालणाऱ्या विमानाने यशस्वी उड्डाण केले. डेहराडून इथून उड्डाण केल्यानंतर हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितरित्या उतरले. स्पाईस जेट या भारताच्या विमान सेवा देणाऱ्या कंपनीने हे चाचणी उड्डाण केले. यापूर्वी फक्त अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला.
 
या विमानात ७५ टक्के एव्हिएशन टर्बाइन फ्युएल तर २५ टक्के जैव इंधन वापरण्यात आले होते. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर याचा देशांतर्गत वापर वाढवण्यावर भर देण्यात येऊ शकतो. त्याचबरोबर सरकारने जैव इंधन आणि इथेनॉलवरील जीएसटीत कपात केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जेट्रोफा या वनस्पतींच्या बियांपासून हे इंधन तयार करण्यात आले.