शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

25 लाखाचे केस चोरी गेले, आरोपी गजाआड

आतापर्यंत रक्कम, दागिने, धान्य यावर दरोडा टाकल्याच्या बातम्या ऐकल्या असतील परंतू दिल्लीत डोक्यावरील केसांचा दरोडा असे प्रकरण समोर आले आहे.
 
दरोडेखोरांनी विग निर्माता व्यापार्‍याकडे सशस्त्र सुमारे 25 लाखाचे केस लुटले. हे केस तिरूपती बालाजी व इतर जागेहून खरेदी केलेले होते.
 
नांगलोई ठाणे पोलिसाने 2 आरोपींना अटक करत केसांची रिकव्हरी व एक पिस्तूल जप्त केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
 
पोलिस चौकशीप्रमाणे पाच दरोडाखोर सशस्त्र आले आणि पिस्तूल दाखवून व्यापार्‍याला बांधून मारहाण केली. नंतर त्यांना एका खोलीत कोंडून विग आणि विग बनवण्यासाठी ठेवलेले 230 किलोग्रॅम केस, 30 हजार रुपये नगदी आणि दोन मोबाइल लुटून पळून गेले होते.