बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 7 ऑगस्ट 2018 (15:42 IST)

सालेम मागतो तिसऱ्या लग्नासाठी सुट्टी कोर्टाने दिला नकार

मुंबई येथे 1993 साली साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपी कुख्यात गॅंगस्टर अबू सालेमला तिसरे लग्न करायचे आहे. लग्नासाठी 45 दिवस पॅरोल मिळावा यासाठी त्याने मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. हायकोर्टाने मात्र त्याचा पॅरोल फेटाळला आहे. अबूच्या अर्जावर मंगळवार सुनावणी झाली आहे. काही दिवसांपूर्वीही अबू सालेम याने तळोजा जेलला अर्ज केला होता. पण नवी मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी हा अर्ज फेटाळला आहे. अबू सध्या मुंबई बाँबस्फोटाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असून त्याच्या अर्जात त्याने असे नमूद केले की तो '12 वर्षे, 3 महिने आणि 14 दिवस मी तुरुंगात आहे. या काळात मी एक दिवसही रजा घेतली नाही. मुंब्रा येथील रहिवासी असलेली कौसर बहार हिच्याशी अबूला लग्न करायचे आहे. त्यामुळे मला आता लग्नासाठी पॅरोल मिळावा', असे तो सांगत आहे. कौसर बहार ही 27 वर्षांची असून ती मुंब्रा येथील रहिवासी आहे. जर त्याचे लग्न झाले तर अबूची सालेम याची ही तिसरी पत्नी असणार आहे. त्याने पहिले लग्न समीराशी झाले आहे.  तिच्याशी त्याने काडीमोड घेतला आहे. समीरापासून अबूला दोन मुले आहेत. ती सध्या अमेरिकेत आहेत. त्याने दुसरे लग्न अभिनेत्री मोनिका बेदीशी केल्याची चर्चा होती. मात्र कोर्टाने त्याला परवानगी नाकारली आणि सध्यातरी त्याला लग्न करता येणार नाही असे चित्र आहे. अबू सालेमच्या नवी लव्हस्टोरी मुंबई-लखनऊ प्रवासात सुरु झाली होती, हे कदाचित तुम्हाला माहीत नसावे. अबुला पोलिसांच्या चोख बंदोबस्तात मुंबईहून लखनऊला कोर्ट सुनावणीसाठी नेण्यात आले होते. या दरम्यान अबूच्या सीटसमोर एक तरुणी बसली होती. ती अबूवर इतकी भाळली की तिने चक्क त्याच्याशी निकाह करण्‍याचा निर्णय घेतला. सैय्यद बहार कौसर असे या तरुणीचे नाव आहे.