गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 ऑगस्ट 2018 (09:05 IST)

प्रेमभंग झालेल्याचा विश्वास उडाला, स्वत:शीच केले लग्न

ऑस्टेलियात प्रेमभंग झालेल्या एका महिलेने विवाह बंधनांवरील विश्वास उडाल्याचे जाहीर करत स्वत:शीच लग्न केल्याचं समोर आलं आहे. या महीलेचे लिंडा डोककर (३४) असं नाव आहे. लिंडाचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. काही कारणांनी त्यांच्यात प्रचंड दुरावा आला. तो इतका टोकाला गेला की त्यांच्यात ब्रेकअप झाले. त्यामुळे लिंडा प्रचंड निराश झाली. तिचा जगण्यावरील विश्वास उडाला. मात्र इजे नावाच्या एका मित्राने तिला समुपदेश करीत भानावर आणले. स्वत:शीच लग्न करण्याची कल्पना तिला इजे मुळेच मिळाली आणि तिने स्वत:शीच लग्न केले.
 
लिंडाने तिच्या लग्न सोहळ्यासाठी सफेद गाऊन परिधान केला होता. समुद्र किनारी रेड कार्पेट अंथरले गेले. हातात फुलांचा गुच्छा घेऊन आणि आरसा पकडून तिने स्वत:शीच लग्नाची प्रतिज्ञा घेत तिने स्वत:शीच लग्न केले. त्यासाठी तिने स्वत:च अंगठी खरेदी केली होती. या लग्नात तिने तिच्या जवळच्या तीन मित्रांना आमंत्रित केलं होतं. आयुष्यात स्वत: वर प्रेम करणे आणि सन्मान देणे ही एक चांगली गोष्ट आहे आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला असं तिचं म्हणणं आहे.