गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: चेन्नई , बुधवार, 8 ऑगस्ट 2018 (11:33 IST)

तामिळनाडू बुडाला शोकसागरात : आज अंत्यसंस्कार ?

पाचवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यविधीस्थळावरुन वाद सुरू आहे. करुणानिधी यांच्या दफनासाठी मरीना बीचवर जागा देण्यास राज्य सरकारनं असमर्थतता दर्शवली आहे. करुणानिधी यांचा दफनविधी मरीना बीचवर व्हावा, अशी मागणी द्रमुकाकडून करण्यात आली होती. त्यानंतर हा वाद मद्रास उच्च न्यायालयात गेला. सध्या या वादावर सुनावणी सुरू आहे. त्यावर मुख्य न्यायाधीश हुलुवादी जी. रमेश यांनी रात्री साडेदहा वाजता मरिना बीचवर करुणानिधींचा अंत्यसंस्कार व सारकारसाठी परवानगी देण्याकरिता रात्री उशीरापर्यंत सुनावणी सुरू होती. त्यामुळे आज (बुधवारी) अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे.
 
द्रमुकाचे सर्वेसर्वा करुणानिधी देशातील सर्वांत ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. तळागाळातील लोकांशी जोडले गेलेले ते जनसामान्यांचे नेते होते. एक विचारवंत, लेखक ज्यांनी आपले संपूर्ण जीवन सर्वसामान्यांच्या हितासाठी व्यतीत केले. प्रादेशिक अस्मिता जपणारे करुणानिधी हे देशाच्या विकासासाठीही जागरूक होते. तमिळी जनतेच्या हितासाठी ते शेवटापर्यंत कार्यरत होते. अनेकवेळा करुणानिधींशी संवाद साधण्याची मला संधी मिळाली. आणीबाणीला त्यांनी केलेला विरोध विसरणे अशक्य आहे. तामिळनाडूतील जनता त्यांना विसरू शकणार नाही. 
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
 
करुणानिधी यांच्या निधनाच्या वृत्ताने मला अतिशय दुःख झाले आहे. करुणानिधी एक सुदृढ वारसा सोडून जात आहेत. सार्वजनिक जीवनात अशी संपत्ती कमी मिळते. करुणानिधी यांचे कुटुंब आणि चाहत्यांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. 
रामनाथ कोविंद, राष्ट्रपती
 
पाचवेळा मुख्यमंत्री  
करुणानिधी यांनी पाचवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भूषविले. पहिल्यांदा 10 फेब्रुवारी 1969 ते 4 जानेवारी 1971, दुसर्‍यांदा 15 मार्च, 1971 ते 31 जानेवारी, 1976 पर्यंत ते मुख्यमंत्री होते. तिसर्‍यांदा 27 जानेवारी, 1989 ते 30 जानेवारी 1991 पर्यंत, चौथ्यांदा 13 मे 1996 ते 13 मे 2001 पर्यंत आणि पाचव्यांदा 13 मे 2006 ते 15 मे 2011 पर्यंत ते मुख्यमंत्रिपदावर विराजमान    होते.
 
जीवनपट
जन्म 3 जून 1924 रोजी तमिळनाडूतील तिरुकुवालाई 
 
1949 अण्णादुराई यांच्याबरोबर डीएमकेची स्थापना
 
1957 तामिळनाडू विधानसभेत प्रवेश
 
1962 विधानसभेचे विरोधी पक्षाचे उपनेते
 
1967 अण्णादुराई सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
 
1969 द्रमुक अध्यक्षपदाची सूत्रे