गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 8 मे 2018 (17:20 IST)

नवा वाद : पोलिसांनी मोराला तिरंग्यात लपेटून केले दफन

दिल्लीतील पोलिसांनी मोराला तिरंग्यात लपेटून दफन केले आहे. त्यानंतर आता पोलिसांवर टीका होत आहे. टीकेनंतर आम्ही कोणताही प्रोटोकॉल मोडला नसल्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या गेट नंबर ५ वर एक मोर जखमी अवस्थेत असल्याची माहिती चार दिवसांपूर्वी टिळक रोड पोलिस ठाण्याला कळवण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमी मोराला ताब्यात घेतले. त्याला चांदनी चौक येथील जैन बर्ड रूग्णालयात नेले. पण, डॉक्टरांनी मोर मृत झाल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी मोराला जौनापुर येथील रूग्णालयात नेले. तिथे त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर वन अधिकाऱ्यांच्या समोर पोलिसांनी मोराला तिरंग्यात लपेटून दफन केले. 

आम्ही मोराला सन्मानाने दफन केले. राष्ट्रीय पक्षी असल्याने मोराला तिरंग्यात लपेटून दफन केले. भविष्यातही जर एखादा मोर आमच्या ताब्यात आला आणि त्याचा जीव गेला तर आम्ही या प्रोटोकॉलचे पालन करू असे  टिळक रोड पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.