सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

मोराला करायचा होता विमान प्रवास

न्यूयॉर्क- या जगात विचित्र माणसांची मुळीच कमतरत नाही. जिथे तिथे काही तरी भन्नाट प्रकार करणारी माणसं पाहायला मिळत असतात. आता अमेरिकेतल्या न्यूयॉर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगळी-वेगळी घटना घडली आहे. तिथे विमानातून प्रवास करण्यासाठी एक महिला चक्क तिच्या मोराला घेऊन विमानतळावर आली होती पण महिला आणि मोराला घेऊन विमानाने प्रवास करण्याची परवानगी नाकारण्यात आली.
 
या महिलेने स्वत:चे आणि मोराचे तिकीट काढले होते तरीही त्यांना विमानाने प्रवास करता आला नाही. विमनतळावरचे मोराचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत.