शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 7 ऑगस्ट 2018 (09:08 IST)

आता शाळांमध्ये क्रीडा तास अनिवार्य असणार

देशात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी आता २०१९ सालापासून शाळांमध्ये क्रीडा तास अनिवार्य असणार आहे. तसेच मुलांवरील अभ्याक्रमाचा बोजा कमी करण्यासाठी यामध्ये ५० टक्के कात्री लावण्यातही येणार आहे. यासाठी केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी पुढाकार घेतला आहे. 
 
या वर्षी खेळ हा अविभाज्य घटक असलेल्या २० शाळा केंद्राकडे असणार आहेत. त्यानुसार प्रत्येक शाळेला सात ते दहा कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक शाळेत दोन ते तीन खेळ अनिवार्य असणार आहेत. त्यामुळे विशिष्ट खेळावर लक्ष केंद्रित करता येईल, असे राजवर्धनसिंग राठोड यांनी आवर्जून सांगितले. रग्बी या खेळाची वर्ल्ड कप ट्रॉफी भारतात आणली असून या ट्रॉफीचे नवी दिल्लीत जल्लोषात स्वागत करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.