शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: रविवार, 5 ऑगस्ट 2018 (00:27 IST)

पोर्टेबल घर...

ब्रिटनमध्ये वेगाने वाढत असलेल्या लोकसंख्येसाठी घरे बांधण्यासाठी घटत असलेली जागेची कमतरता आता दूर होऊ शकते. तेथे आता अंडाकृती आकाराची छोटी पोर्टेबल म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे हलविता येणारी घरे बनविली आहेत. त्यांना वेगवेगळे तुकडे एकत्र जोडून तयार केले जाईल. चार ते सहा तासांची मेहनत करून हे घर कोणत्याही ठिकाणी उभे केले जाऊ शकेल. 13 फूट व्यासाचे हे अंडाकृती घर खास धातूपासून बनविले जाते. चार लोकांच्या कुटुंबासाठी हे घर पुरेसे ठरेल.