रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 ऑगस्ट 2018 (15:46 IST)

प्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची आत्महत्या

धक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत निघालेल्या व्यापाऱ्यानं गांधीसागर तलावात उडी मारून आत्महत्या केली आहे. या व्यापाऱ्याच नाव नरेश तोलानी (५१ वर्ष) असे आहे. प्लास्टिक बंदीमुळं व्यापाऱ्यानं आत्महत्या केल्याची ही पहिलीच घटना आहे असून त्यामुळे इतर व्यापारी धास्तावले आहेत. मागील तीस वर्षांपासून तोलानी प्लास्टिक पिशवी विक्रीचा व्यवसाय करत होते. तोलानी कंपन्या, घाऊक विक्रेत्यांकडून पिशव्या खरेदी करून त्या दुकानांमध्ये विकत असत. मात्र प्लास्टिक बंदी लागू होताच त्यांचा व्यवसाय ठप्प झाला, त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक चणचणीमुळं अनेक दिवसांपासून त्रस्त झाले होते. तोलानी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहून ठेवली आहे. ती नोट शहरातील गांधीसागर तलावाजवळ सापडली आहे. या नोट मध्ये तोलानी लिहितात की 'प्लास्टिक बंदीमुळं त्रासलो आहे. माझ्या आत्महत्येला मीच जबाबदार आहे,' प्लास्टिक बंदीमुळं तोलानींना आर्थिक नुकसान झाले त्यामुळे त्यांना नैराश्य आले होते. गणेशपेठ पोलिस अधीक्षक तपास करीत असल्याचे पीएसआय अमित आत्राम यांनी सांगीतले आहे.