मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 जानेवारी 2019 (09:14 IST)

मणिकर्णिका ५० देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार

येत्या २५ जानेवारीला ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलगू भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जगभरातील ५० देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनं दिली आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात कंगना राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत आहे. कंगना व्यतिरिक्त अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी यासारखे मराठी कलाकारही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं कंगना दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण करत आहे.