बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 मार्च 2018 (20:12 IST)

पाहा अंकिता लोखंडेचा लुक

अंकिता लोखंडे आता  कंगना राणावतच्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमातील तिचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

चित्रपटात अंकिता झलकारी बाईची भूमिका साकारत आहे. झलकारी बाई या राणी लक्ष्‍मीबाई यांच्‍या विश्‍वासू सैनिक होत्‍या. महिला सैन्यदलाच्या त्या सेनापती होत्या. हिरव्या आणि लाल रंगाच्या साडीत अंकिता लोखंडे अतिशय सुंदर दिसत आहे.

"सिनेमातील आपल्या वाट्याचं चित्रीकरण अंकिताने पूर्ण केलं आहे. झलकारी बाई यांच्याबाबत मी कधीही ऐकलं नव्हतं, पण त्या भारताच्या इतिहासातील मोठ्या योद्ध्या होत्या. पडद्यावर त्यांची भूमिका साकारणं माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे," असं अंकितासांगते.