रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

वाजपेयीचं ट्‍विटर अकाऊंट हॅक

अभिनेता मनोज वाजपेयीचं ट्‍विटर अकाऊंट हॅक झालं आहे. कोणा अनोळखी व्‍यक्‍ती अथवा ग्रुपने हे अकाऊंट हॅक केल आहे. त्‍याचं ट्‍विटर अकाऊंट हॅक झाल्‍याची माहिती त्‍यानं खुद्‍द ट्‍विटरवरून  दिली आहे.

त्‍यात त्‍याने म्‍हटले आहे, 'माझं ट्‍विटर अकाऊंट हॅक झालं आहे. यावर सोल्‍युशन शोधण्‍याचा प्रयत्‍न सुरू आहे. कोणताही मॅसेज अथवा  लिंकवर क्‍लिक करू नका.'  ट्‍विटर हॅक झाल्‍याचे वृत्त शेअर केल्‍याबद्‍दल मनोज वाजपेयीने चाहत्‍यांचे आभार मानले आहेत. शिवाय, सावध राहण्‍यासही सांगितले आहे.