बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 मार्च 2018 (08:44 IST)

आता आमिरखानही आला इन्स्टाग्रामवर

आमिरखानने  वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू करून चाहत्यांना छान सरप्राईज दिलं आहे. विशेष म्हणजे अमिरनं त्यावर काही पोस्ट करण्याआधीच अडीच लाखांहून अधिक लोकांनी त्याला फॉलो करायला सुरूवातही केली होती. आमिरनं आपल्या पहिल्यावहिल्या पोस्टमधून आपली आई जीनत हुसैन यांचा फोटो शेअर केला आहे. ‘आज मी जो आहे ते केवळ आणि केवळ तिच्यामुळेच आहे’ असं लिहित आमिरनं आईचा जूना फोटो शेअर केला आहे.