शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 मार्च 2018 (15:23 IST)

प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी गेला जेलमध्ये

daler ehandi

प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी याला दोन वर्षांची कैद झाली आहे. त्याला मानव तस्करी प्रकरणी कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. दलेर मेहंदी विरोधात मानव तस्करीचा गुन्हा २००३ मध्ये दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर शोच्या माध्यमातून त्याच्यावर लोकं परदेशात पाठवण्याचा आरोप होता. तर हा गुन्हा अमेरिकेत नोंदवला गेला होता. यानुसार १९ ऑक्टोबर २००३ बख्शीश सिंह नावाच्या व्यक्तीनेमध्ये दलेर मेहंदी विरोधात मानव तस्करी प्रकरणी तक्रार दाखल केली होती. दलेर मेहंदीचा भाऊ शमशेर सिंह हा सुद्धा आरोपी आहे. दोन्ही भावांनी काही लोकांना आपल्या टीममध्ये सदस्य बनवून परदेशात पाठवले. १९९८-१९९९ मध्ये दलेर मेहंदी आपल्या टीमसोबत २ लोकांना परदेशात घेऊन गेला होता. तर तेथेच विना परवाना त्यांना सोडून आला होता.