बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 1 ऑक्टोबर 2018 (09:15 IST)

आणखीन एकाने मणिकर्णिका सोडला

‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’या चित्रपटातून काही दिवसांपूर्वीच अभिनेता सोनू सूद या अभिनेत्याने तडकाफडकी कंगनाचा हा चित्रपट सोडल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यामागोमाग आता स्वाती सेमवालनेही चित्रपट सोडला आहे. ऐतिहासिक कथानक असणाऱ्या या चित्रपटामध्ये स्वातीने पार्वती (सदाशिवराव भाऊंची पत्नी) ही व्यक्तीरेखा साकारताना दिसत होती.
 
गेल्या काही दिवसापासून स्वाती हा चित्रपट सोडणार अशा चर्चा होत्या. पण, त्याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नव्हती. आता मात्र खुद्द स्वातीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.‘सोनू सूदने चित्रपट सोडल्यानंतर माझ्या भूमिकेला फारसं महत्व राहिलं नव्हतं. त्यामुळे टीमशी चर्चा केल्यानंतरच मी हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला’, असं स्वातीने सांगितलं.