मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

कंगनाची करणी सेनेला चेतावणी, मी सुद्धा राजपूत आहे, नष्ट करून टाकीन...

Manikarnika: The Queen of Jhansi
मणिकर्णिका या चित्रपटात झांसीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका बजावणारी चित्रपट अभिनेत्री कंगना राणावतने राजपूत करणी सेनेला चेतावणी दिली आहे की जर या चित्रपटाच्या रिलीजमध्ये काही समस्या निर्माण केली तर
ती त्यांना नष्ट करून टाकेल. कंगना म्हणते की करणी सेना त्यांच्या चित्रपट मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी विषयी सतत टीका करत आहे. पुढील शुक्रवार, 25 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 
 
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने देखील याला प्रमाणपत्र जारी केले आहे. करणी सेनेच्या वागणुकीमुळे रागावली कंगना म्हणाली की ती सुद्धा राजपूत आहे आणि जर करणी सेनेने याच्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर ती सर्वांना नष्ट करेल. हे उल्लेखनीय आहे की भंसालीची फिल्म पद्मावत देखील करणी सेनेच्या विकृतीचा शिकार झाली होती. 
 
सूत्रांप्रमाणे या चित्रपटात राणी लक्ष्मीबाई आणि ब्रिटिश अधिकारी यांच्यात प्रेमसंबंध दर्शवण्यात आले आहे. या बाबतीत करणी सेना रागावली आहे. त्याच बरोबर त्यांना चित्रपटात राणीच्या स्पेशल डान्स सीक्वेंसवर देखील आक्षेप आहे.