शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'उरी'सोशल मीडियावर लीक, निर्मात्यांना धक्का

सत्य घटनेवर आधारीत 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा सोशल मीडियावर लीक झालाय. यामुळे चित्रपट निर्मात्यांना एकच धक्का बसलाय. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केलीय. रोनी स्क्रूवाला हा या सिनेमाचा निर्माता आहे तर या सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य धर यानं केलंय. उल्लेखनीय म्हणजे, या सिनेमाच्या यशानंतर निर्माता रोनी स्क्रूवाला यानं सेना दिनाचं औचित्य साधत शहीद जवानांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत देऊ केली होती.
 
'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' या सिनेमात रोनी स्क्रूवाला, आदित्य धर, विक्की कौशल, यामी गौतम परेश रावल आणि मोहित रैना यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा ११ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे.