1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'उरी द सर्जिकल स्ट्राइक' 2019 चा पहिला हिट चित्रपट

bollywood news
2019 ची सुरुवात बॉलीवूडसाठी चांगली राहिली आहे. 11 जानेवारीला उरी द सर्जिकल स्ट्राइक हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि हिट देखील राहिला. या चित्रपटाने पहिल्या विकेंडला शानदार प्रदर्शन केले आहे आणि आशा आहे की हा चित्रपट वीकडेजमध्ये देखील प्रदर्शन चांगलं राहण्याची शक्यता आहे.
 
पहिल्या दिवशी 8.20 कोटी बॉक्स ऑफिस कलेक्शनसह चांगली सुरुवात झाली. कोणी देखील या चित्रपटाशी पहिल्या दिवशी अशा प्रदर्शनाची अपेक्षा केली नव्हती. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी, कलेक्शनने 51.59 टक्के उडी मारली. या दिवशी, चित्रपटाने 12.43 कोटी रुपये जमा केले. दुसऱ्या दिवसाच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी कलेक्शन 21.48 टक्के जास्त झालं. रविवारी चित्रपटाने 15.10 कोटी रुपयांचे संकलन केले. पहिल्या विकेंडवर चित्रपटाने 35.73 कोटी रुपयांचा कलेक्शन केलं आणि हिट झालं.
 
चित्रपटाचं बजेट 28 कोटी आहे. पहिल्या विकेंडच्या कलेक्शन आणि विविध राइट्स विकून मिळालेल्या किमतीच्या आधारावर चित्रपटाने त्याच्या खर्च काढला आहे आणि म्हणून, 2019 चा पहिला हिट चित्रपट बनला आहे. आरएसव्हीपी बॅनरने डिसेंबरमध्ये केदारनाथ हा चित्रपट यशस्वी केला आणि आता जानेवारीमध्ये उरी. आदित्य धर यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात विकी कौशल, मोहित रैना, किर्ती कुलहारी, परेश रावल आणि यामी गौतम हे प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट एका खऱ्या कथेवर आधारित आहे.