रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

ठाकरे मराठी चित्रपटात मिळमिळीत बाळासाहेब यांचा आवाज जोरदार टीका

खासदार संजय राऊत ठाकरे हा चित्रपट घेवून येत आहे. हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत हा चित्रपट आहे. यात हिंदीत नवाज्जूदिन सिद्धिकी करत आहे. त्याने उत्तम प्रकारे काम केले आहे. मात्र त्यात मराठी साठी बाळासाहेब यांचा  ठाकरी आवाज मात्र एकदम मिळमिळीत झाला आहे. ठाकरे यांचा बेफिकीर आणि करडा आवाज हरवून गेला असून गोड बोलणारा आवाज झाला आहे अशी जोरदार टीका होवू लागली आहे. 
 
शिवाजी पार्कात गाजणारा ठाकरी आवाजाला जी धार होती ती हरवली आहे असे अनेक म्हणत आहेत. दैनिक लोकसत्ता तील एका लेखात तर आवाजावर जीरदार नाराजी दाखवली असून मैफिलीत गळा लागतो, सभेसाठी नरडं लागतं. सचिन खेडेकर यांच्या आवाजात बाळासाहेबांच्या आवाजातला करारीपणा तर नाहीच, मग त्यांच्या आवाजातून व्यक्त होणारी त्यांची बेफिकिरी कुठून येणार ? अशी जोरदार टीका केली असून ती अनेक अंशी खरी सुद्धा आहे. काव्यवाचन किंवा पुलंच्या साहित्याचं पार्ले, डोंबिवलीत अभिवाचन ऐकण्यासाठी उपस्थित राहणारी माणसं आणि शिवाजी पार्कवरच्या जाहीर सभेत धडाडणारी ठाकरी तोफ ऐकण्यासाठी येणारी माणसं ही दोन्ही मराठीच असली तरी वेगळी असतात. असे म्हटले गेले आहे आहे. तर चांगला एखादा आर्टिस्ट शोधून बाळासाहेब यांचा आवाज तोही करारा करता आला असता अशी अपेक्षा केली आहे.बाळकडू सिनेमाला ज्यांनी आवाज दिला ते  शशितल यांचा आवाज देखील चांगला होता असे पुढे आले त्यामुळे मराठी प्रेक्षकाची बोळवण झाली आहे असे दिसते आहेत.