1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

विक्की कौशल अभिनित 'उरी' चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज

bollywood news
बॉलीवूड अभिनेता विक्की कौशलचा आगामी चित्रपट 'उरी' ची खूप चर्चा आहे. या चित्रपटात तो भारतीय सैन्यातील भूमिकेत आहे. 
 
अलीकडेच 'उरी' चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झाले आहे. फिल्मच्या पहिल्या गाण्याचे नाव 'छल्ला' आहे. या गाण्याचे गायन रोमी, हरिहरन, शाश्वत सचदेव यांनी आपल्या अत्यंत सुमधुर आवाजात केले आहे. कुमार यांनी हे गीत लिहिले आहे. गाण्याचे व्हिडिओ पाहताना देशभक्ती जागृत होईल. 
 
आतापर्यंत 'छल्ला' गाण्याला यूट्यूबवर 3 लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. 'उरी' हा चित्रपट वर्ष 2016 मध्ये भारतीय सेने द्वारा पाकिस्तानवर झालेल्या सर्जिकल स्ट्राइकने प्रेरित आहे. 18 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सेनेच्या शिबिरावर पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. हा चित्रपट ती कथा सांगतो. 
 
चित्रपट आदित्य धर यांनी दिग्दर्शित केले असून यात विक्की कौशल एक भारतीय सैन्यातील भूमिकेत आहे, तर दुसरीकडे यामी गौतम इंटेलिजेंस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पुढल्या वर्षी 11 जानेवारी रोजी रिलीज केला जाईल.