शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘देसी गर्ल’च्या लग्नाचे अपडेट सर्वात जास्त वेळा सर्च झाले

गुगलनेही २०१८तील सर्वाधिक सर्च झालेल्या सेलिब्रिटींच्या लग्नाची एक यादी जाहीर केली. या यादीमध्ये बॉलिवूडमधील ‘देसी गर्ल’च्या लग्नाविषयीचे अपडेट जाणून घेण्यासाठी गुगलवर सर्वात जास्त वेळा सर्च केले गेलं आहे.
 
गुगलने जाहीर केलेल्या ‘मोस्ट गुगल्ड वेडिंग’च्या या यादीत प्रियांका चोप्राच्या लग्नाचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रियांकानंतर दीपिकाच्या लग्नाचाही समावेश यात करण्यात आला असून या दोन्ही अभिनेत्रींच्या लग्नाचा समावेश गुगलच्या ‘टॉप-५’ लिस्टमध्ये करण्यात आला आहे. याचा अर्थ भारतीय सेलिब्रिटींचे हे लग्न विदेशातही ट्रेंडमध्ये राहिले.
 
दरम्यान,‘मोस्ट गुगल्ड वेडिंग’च्या यादीत तिस-या क्रमांकावर प्रिन्सेस Eugenieचे लग्न असून चौथ्या स्थानावर Kat Von Dचे लग्न आहे. तर पाचव्या स्थानावर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचं लग्न आहे.