शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

प्रियंका-निकच्या रिसेप्शनला मोदींनी लावली हजेरी, दंपतीला दिला आशीर्वाद

शाही विवाह सोहळ्यानंतर प्रियंका चोप्रा आणि निक जॉनास यांनी दिल्ली येथे रिसेप्शन आयोजित केले ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सामील झाले. या व्यतिरिक्त अनेक गणमान्य व्यक्ती, कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळी समारंभात सामील झाले.
 
निकने काळ्या रंगाच्या ट्राउजरवर वेल्वेट जॅकेट परिधान केले होते आणि प्रियंकाने बेज रंगाचा लहंगा घातला होता. तसेच पांढर्‍या रंगाच्या गुलाबांचा जुड्यामध्ये प्रियंका खूपच सुंदर दिसत होती.
 
पंतप्रधान खास पाहुणे म्हणून येथे आले आणि दोघांना आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी आशीर्वाद दिला.