शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

11 वर्ष लहान आहे प्रियांका चौप्राचा जोडीदार निक, आईने दिला हा सल्ला

Priyanka Chopra
प्रियांका चौप्राच्या जीवनात आविष्याचे खास आनंदी क्षणांचे आगमन झाले आहे. प्रियांका आपल्या 11 वर्ष लहान निक जोनससोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
 
कोण आहे निक
निक जोनस एक अमेरिकन सिंगर आणि एक्टर आहे. निक लहानपणापासून नाटकात भाग घेत असून तो आपल्या वडीलांसोबत थिएटर जात होता. त्याने अनेक प्रसिद्ध प्ले केले आहे ज्यातून ब्यूटी एंड दा बीस्ट सारखे नाव सामील आहेत. या नाटकात काम करत असतानाच त्याने क्रिश्मस प्रेयर हे गाणं लिहिलं आणि या गाण्याने गायन क्षेत्रात पाऊल ठेवले. 
 
कसे भेटले प्रियांका आणि निक
या दोघांची भेट एका अमेरिकन टिव्ही शो क्वांटिको मध्ये झाली होती ज्यात प्रियांका काम करत होती. निक त्या सेटवर आले होते. तिथेच त्यांची भेट झाली आणि हळू-हळू जवळीक निर्माण झाली. नंतर मेट गाला इव्हेंटमध्ये प्रियांका निकची डेट म्हणून सामील झाली आणि नंतर दोघे प्रेमात पडले. 
 
प्रियांका आणि निकला अनेकदा सोबत बघितले गेले. नंतर दोघे भारतात आल्यावर मात्र चर्चा रंगल्या की दोघे रिलेशनमध्ये असून लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
 
आईचा सल्ला
दरम्यान एका मुलाखातीत प्रियांकाची आई मधु चोप्रा ने म्हटले की 'नवरा इतका समर्थ असला पाहिजे की त्याने आपल्या बायकोचे आरोग्य आणि सुखाबद्दल विचार करायला हवा. दोघांमध्ये इतकं प्रेम असावं की प्रत्येक दिवस व्हेलेंटाइन डे पेक्षा कमी नसावा. त्यांनी म्हटले की 'एककेमाशी भांडण्यापेक्षा शांतपणे बसून एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.' 
 
आता प्रियांका लवकरच लग्न करणार याअर्थी आईचा सल्ला नक्की कामास येईल.