भन्साळींच्या चित्रपटालाही प्रियंकाचा टाटा
पर्सनल आणि प्रोफेशनल अशा दोन्ही कारणांनी बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या चर्चेत आहे. सलमान खानच्या 'भारत' या चित्रपटातून ऐनवेळी तिने अंग काढून घेतले. त्यानंतर तिच्या या निर्णयाची बरीच चर्चा झाली. तिने ऐनवेळी अशाप्रकारे 'दगा' देऊन भाईजानची नाराजीही ओढवून घेतली. पण कदाचित याने काहीही फरक प्रियंकाला पडत नाही. कारण तिने असाच टाटा-टाटा, बाय-बाय संजय लीला भन्साळींच्या एका बॉलिवूड प्रोजेक्टलाही केल्याची खबर आहे. एका वृत्तानुसार, सुमारे वर्षभरापूर्वी संजय लीला भन्साळींच्या 'गंगूबाई कोठेवाली' या गँगस्टर आधारित चित्रपटाबद्दलची बातमी आली होती. या चित्रपटासाठी भन्साळी आणि प्रियंका एकत्र येणार, अशी बातमी होती. पण हा चित्रपट आता प्रियंकाने सोडल्याचे वृत्त आहे. प्रियंकाने 'भारत'प्रमाणेच हा चित्रपट करण्यासही नकार दिला आहे. प्रियंकाने भन्साळींची नाराजी हॉलिवूड चित्रपटासाठी ओढवून घेतल्याचे समजते. तूर्तास प्रियंकाच्या या निर्णयाने भन्साळी अचंबित आहेत.