मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 23 जून 2018 (17:13 IST)

निक- प्रियांका भारतात आले

अभिनेत्री प्रियांका चोप्राचा अमेरिकन मित्र,हॉलिवूड अभिनेता आणि सिंगर निक जोनस हा प्रियांकासोबत भारतात आला आहे. प्रियांका निकला आपल्‍या आईशी भेटवणार असल्‍याची माहिती मिळतेय. 

निक आणि प्रियांका परदेशात निकच्या हातात हात घालून विविध सोहळ्यात एकत्र फिरताना दिसले होते. सिंगर निक जोनस याच्या कझिन्सच्या विवाह सोहळ्यात निकसोबत प्रियांकाने देखील हजेरी लावली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रियांकाने विवाह सोहळ्यात गोल्डन रंगाची जर्सी परिधान केली होती. काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क एअरपोर्टवर दोघे एकत्र स्पॉट झाले होते. २०१७ साली मेटा गाला या रेड कार्पेटर दोघे एकत्र उतरले होते. 

आता निकला घेऊन प्रियांका थेट भारतात आली आहे. तिचे विमानतळावर आगमन झाल्‍यानंतर चाहत्‍यांना त्‍या दोघांना एकत्र पाहता आले. निक-प्रियांकाची छबी कॅमेर्‍याबध्‍द करण्‍यात आली. दोघांनी आपल्या रिलेशनशीपचा खुलासा उघडपणे केलेला नाही.