मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 28 जानेवारी 2019 (08:49 IST)

चित्रीकरणादरम्यान क्रू मेंबरचा मृत्यू

अभिनेता शाहीद कपूरचा आगामी चित्रपट 'कबीर सिंह'चे मसूरीमध्ये चित्रिकरण सुरु असतांना चित्रपटाच्या एका क्रू मेंबरचा मृत्यू झाला आहे. मसूरीतील एका हॉटेलमध्ये 'कबीर सिंह' चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. त्यावेळी एका जनरेटर कंपनीसोबत काम करणाऱ्या 30 वर्षीय रामू या व्यक्तीला हॉटेलमध्ये जनरेटर दुरूस्त करण्यासाठी बोलवण्यात आले होते. जनरेटर दुरूस्त करण्यावेळी अचानक रामूच्या टोक्यातील मफलर जनरेटरच्या फॅनमध्ये अडकले. यात रामू गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी देहरादून येथील रूग्णालयात नेत असतानाच रामूचा दुर्दैवी मृत्यू झाला.  मृत रामू मुजफ्फरनगर येथील रहिवासी आहे.