1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 जानेवारी 2019 (14:37 IST)

निती मोहनने केले या गायिकेला रिप्लेस

neeti mohan
रायझिंग स्टार हा रिअ‍ॅलिटी शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या शंकर महादेवन, दिलजित दोसांझ आणि त्यांच्यासोबत निती मोहन दिसणार आहे. लवकरच निती मोहन निहार पांड्यासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. या आधी शंकर महादेवन, दिलजित दोसांझच्यासोबत आपल्याला मोनाली ठाकूर दिसली होती मात्र आता तिची जागा निती मोहनने घेतली आहे. या आधी रायझिंग स्टारचे दोनही सीझन हिट गेले होते. यानंतर हा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. निहार आणि निती दोघेही दीर्घकाळापासून एकेकांना डेट करत आहेत. आता हेकपल लग्राच्या निर्णयापर्यंत आले आहे. निहार व निती यांनी जाणीवपूर्वक लग्राची बाती दडवून ठेवली आहे. आपले लग्न एक खासगी सोहळा असावा, अशी दोघांची इच्छा आहे. पण येत्या फेब्रुवारीत हे कपल लग्रबंधनात अडकणार, हे मानले जात आहे. नितीबद्दल सांगायचे झाले तर ती बॉलिवूडमध्ये एक आघाडीची गायिका आहे. जब तक है जान, सोनू के टिटू की स्वीटी असा सुपरहिट चित्रपटांसाठी तिने गायले आहे. तर निहार पांड्या लवकरच बॉलिवूड डेब्यू करतोय. कंगनाच्या राणावतच्या मणिकर्णिका-द क्वीन ऑफ झांसीधून निहार पदार्पण करत आहे.