मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 21 जानेवारी 2019 (15:44 IST)

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'डॉन 3'

बॉलिवूडचे अँग्री यंग मॅन म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन यांच्या डॉन चित्रपटातील डॉन का इंतजार तो ग्यारह मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन डॉन को पकडना मुश्किल ही नहीं नामुकिन है हा डायलॉग मोठ्या पडद्यावर   पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला डॉन चित्रपटाचा तिसरा भाग येणार आहे. शाहरुखने काही वर्षांपूवीच अ‍ॅक्शन चित्रपटापासून थोडी विश्रांती घेणार असल्याचे म्हटले होते. मात्र तसे घडले नाही. त्याचा चेन्नई एक्स्प्रेस, हॅप्पी न्यू इयर, फॅन, रईस यासारख्या चित्रपटातून तो अ‍ॅक्शन करताना दिसला. तो आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अ‍ॅक्शन करण्यासाठी सज्ज होत आहे. आता डॉनचा तिसरा खेळ बॉलिवूडचा बादशहा मांडणार आहे. फरहान अख्तर याचे दिग्दर्शन करणार आहे. रितेश सिध्दवाणीचीही याला साथ आहे. 'डॉनशिवाय आम्ही डॉन कसा साकारणार? शाहरुख डॉन आहे आणि डॉन शाहरुख', असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 2016 मध्ये डॉन चित्रपटाचा पहिला भाग आला होता. फरहान अख्तरने याचे दिग्दर्शन केले होते. अमिताभ बच्चन यांच्या 1978 मध्ये आलेल्या डॉन चित्रपटाचा हा रिमेक होता. फरहानने त्यानंतर याचा दुसरा भाग बनवला. दोन्ही भागात शाहरुख आणि प्रियांका चोप्रा होते. डॉन 3 मध्ये शाहरुख करणार हे निर्मिती असले तरी नायिकेचे कास्टिंग अद्याप झालेले नाही.