मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 9 जानेवारी 2019 (10:24 IST)

बॉलिवूडमधील खान तिकडीसाठी गेले वर्ष निराशाजनक

गेल्या 12 वर्षांत प्रथमच वर्षात सर्वाधिक व्यवसाय करणार्‍या चित्रपटांच्या यादीत खान तिकडी म्हणजे सलमान, आमिर आणि शाहरुख यांचे चित्रपटबॉक्स ऑफिसवर पहिल्या तीनमध्ये आलेला नाही. त्यामुळे गेले वर्ष या तिकडीसाठी फारसे समाधानाचे राहिलेले नाही. सलमानखानचा रेस 3 गतवर्षात सर्वाधिक ट्रोल झाला आणि त्याने अवघ्या 166.40 कोटींचा व्यवसाय केला. सलमानच्या अन्य चित्रपटांच्या तुलनेत ही कमाई नगण्य आहे. आमिरच्या बहुचर्चित ठग्स ऑफ   हिंदोस्तानने 151.19 कोटींच्या व्यवसाय केला तर नाताळात आलेल्या शाहरुखच्या झिरोची कमाई 88.85 कोटी झाली. गतवर्षात सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट ठरले रणबीर कपूरचा संजू (342.53 कोटी), रणवीरचा पद्मावत (302.15 कोटी) आणि सिम्बाची आताची कमाई 173.15 कोटी. 2017 मध्ये सलानचं टायगर जिंदा है ने 339.16 कोटींची कमाई करताना पहिला नंबर मिळविला होता. 2016 मध्ये आमिरच्या दंगलने 387.38 कोटींची कमाई करून बॉक्स ऑफिसवर धमाल केली होती तर 2007 मध्ये शाहरुखचे ओम शांती ओम आणि चक दे इंडिया आघाडीवर होते.