शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 5 जानेवारी 2019 (16:09 IST)

डायनाच्या बायोपिकमध्ये काम करणची इच्छा

dipika padukon
लवकरच छपाक या बायोपिकमधून अभिनेत्री दीपिका पादुकोण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती यात अ‍ॅसिडी हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारणार आहे. या बायोपिक पाठोपाठ आता दीपिकाने आपल्याला आणखी एका व्यक्तीच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. कोणाच्या बायोपिकमध्ये काम करायला तुला आवडेल? असा प्रश्र्न एका मुलाखतीदरम्यान दीपिकाला विचारला गेला. दीपिकाने याचे उत्तर देताना प्रिन्सेस डायनाचे नाव घेतले. माझ्यावर प्रिन्सेस डायनाचा खूप प्रभाव असून मी आजही तिचे व्हिडिओ पाहात असल्याचे दीपिकाने म्हटले. लोकांशी ती कशा प्रकारे बोलत असे हे सर्व मी लक्ष देऊन पाहत असते. माझ्यासाठी तिच्या निधनाची बातमी खूप मोठा धक्का होता असेही दीपिकाने यावेळी सांगितले. डायनाच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात याच कारणामुळे काम करण्याची संधी मिळाली तर मी कधीच सोडणार नाही, असे दीपिकाने म्हटले आहे. एका कार अपघातात 1997 साली प्रिन्सेस डायनाचा मृत्यू झाला. याबायोपिकमध्ये काम करण्याची दीपिकाची इच्छा आता पूर्ण होते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.