गुरूवार, 11 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 9 एप्रिल 2019 (11:22 IST)

सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहो परत - इरफान खान

Come back to entertain
अभिनेता इरफान खानने त्याच्या गंभीर आजारावर मात केली असून तो बॉलिवूडमध्ये परतला आहे. त्याच्या आजारामूळे तो चित्रपट सृष्टीपासून फार काळ दूर होता. ५२ वर्षीय अभिनेता इरफान मागील काही महिन्यांपासून लंडनमध्ये न्यूरो एंडोक्राइन ट्यूमर आजारावर उपचार घेत होता. त्यानंतर आज तो कर्करोगावर मात करत पुन्हा बॉलिवूडमध्ये परतला आहे.
राजस्थानमध्ये ‘अंग्रेजी मीडियम’ या आपल्या चित्रपटाचे चित्रीकरण करतानाच एक फोटो इरफान खानने आपल्या ट्विटर खात्यावरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये इरफान खान एका मिठाईच्या दुकानाबाहेर उभा राहिलेला दिसत आहे. २०१८ मध्ये इरफानचा ‘कारवां’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. इरफान पुन्हा परतल्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची वार्ता असेल.