सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By

चैत्र नवरात्री: या पाच उपयांनी प्रसन्न होईल देवी, सुख- संपत्ती लाभेल

शक्ती उपासनेचा महापर्व आहे नवरात्री. नवरात्रीच्या साधनेमुळे प्रसन्न होऊन देवी आपल्या साधकांवर पूर्ण वर्ष कृपेचा वर्षाव करत असते. चैत्र नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहे. हे उपाय भक्ती - भावाने केल्याने इच्छित फल प्राप्ती होते. तर जाणून घ्या असे पाच उपाय ज्याने देवी आपल्या प्रसन्न होऊन भरभरुन आशीर्वाद देईल.
 
शक्ती साधनेमुळे प्रसन्न होऊन देवी आपल्या भक्तानंा त्रिबिध तापों ( दैहिक, दैविक आणि भौतिक ) याने मुक्त करते. भक्तांना सुख-संपत्ती आणि आरोग्याचे आशीर्वाद देते. चैत्र नवरात्रीत देवी दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पूजेत लाल रंगाचा फुल विशेष रूपाने प्रयोग केले पाहिजे परंतू देवी शीघ्र अति शीघ्र प्रसन्न करु इच्छित असाल तर नवरात्रीच्या नऊ दिवसांत कोणत्याही एक दिवस कमळाचा फुल नक्की अर्पित करावे. धनाची देवी आई लक्ष्मीला कमळाचे फुल अती प्रिय आहे. या फुलाने पूजा केल्याने धन- संपदा आशीर्वाद प्राप्त होतं.
 
शक्ती साधना करताना अनेकदा इतके तल्लीन होऊन जातात की आम्हाला पूजेचे सर्व नियम लक्षात राहत नाही. याच प्रकारे अनेकदा पूजेची योग्य विधीचे ज्ञान नसल्यामुळे चुका होता. या समस्येचा निदान आमच्या धर्मशास्त्रांमध्ये दिलेले आहे. दुर्गा सप्तशतीच्या पाठमध्ये क्षमा प्रार्थनेचा प्रावधान आहे. अर्थात पूजा करताना काही चुका झाल्या तर आपण दुर्गा सप्तशतीच्या शेवटी क्षमा प्रार्थना वाचून माफी मागू शकता आणि आपली पूजा पूर्ण होईल. तसेच देवीची पूजा करतना सुनिश्चित करावे की पूजा निर्मळ मनाने तसेच योग्य विधी आणि नियमाने पूर्ण झाली पाहिजे.
 
तसेच घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी नवरात्रीत घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक काढायला विसरु नका. सोबतच गणपतीची पूजा देखील विधी-विधान पूर्वक करावी. याने सर्व प्रकाराच्या बाधा दूर होतात.
 
नवरात्रीत कमळाच्या फुलावर विराजित देवी लक्ष्मीच्या प्रतिमेची पूजा करणे शुभ मानले गेले आहे. असे केल्याने देवी दुर्गासह देवी लक्ष्मीची कृपा मिळते.
 
आर्थिक समस्या दूर करण्यासाठी नवरात्रीत देवीला लाल रंगाचा कपडा आणि कवड्यात अर्पित कराव्या. नंतर लाल कपड्यात या कवड्या ठेवून आपल्या तिजोरीत किंवा धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवून द्यावा.