1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 10 एप्रिल 2019 (11:00 IST)

बेबी बंपसोबत पुलामध्ये उतरली समीरा रेड्डी, झाली जोरदार ट्रोलिंग

sameer reddy
फिल्म अॅक्ट्रेस समीरा रेड्डी सध्या गर्भवती आहे. ती दुसर्‍यांदा आई होणार असून प्रेग्नेंसी पिरियडचा आनंद घेत आहे.   
 
नुकतेच समीरा रेड्डी बेबी बंपसोबत स्विमिंग पुलामध्ये दिसली. तिने स्विमसूट घातला होता. तिने स्वत:ने इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करत लिहिले आहे की आज सोमवार आहे पण ती परत रविवारमध्ये पोहोचली आहे.   
 
समीराचे मानणे आहे की ती जीवनाच्या या सुंदर क्षणांचा आनंद घेत आहे. आई बनण्याची जाणीव काही वेगळीच असते.  
काही दिसवाअगोदर तिने आपले फोटो अपलोड केले होते ज्यात ती प्रेग्नेंट आहे दिसून येत होते. तसेच तिचे वजन देखील वाढलेले होते. त्यावर तिचे जोरदार ट्रोलिंग झाले होते.   
 
समीराने गुपचुप राहण्यापेक्षा उत्तर देणे जास्त योग्य समजले. तिने लिहिले आहे की बॉडी शेमिंग ट्रोलिंग करणार्‍यांसाठी माझा एक प्रश्न आहे की ते लोक कुठून आले आहे? 
Photo : Instagram
तुम्ही लोकांनी देखील आईच्या पोटातूनच जन्म घेतला आहे ना. जेव्हा तुम्ही तुमच्या आईच्या पोटात होता तेव्हा तुमची आई सुंदर नव्हती दिसत का? असल्या प्रकारच्या गोष्टी करणे किती लज्जास्पद आहे.  
 
समीरानुसार प्रत्येक महिला करीना कपूर सारखी नसते जी बाळाला जन्म दिल्यानंतर परत शेपमध्ये येते. मला थोडा वेळ तर द्या.