मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 8 एप्रिल 2019 (12:08 IST)

कंगना रनौटसोबत काम करायचे आहे करण जौहरला

कंगना रनौट आणि करण जौहर एक मेकनं भाई भतीजावाद (नेपोटिज्म) च्या मुद्द्यांवर घेरताना दिसत आहे. नुकच्याच एका मुलाखतीत करणने कंगनाची फार तारीफ केली आहे. एवढंच नव्ह तर करण जौहरने असे देखील म्हटले की भविष्यात कंगनासोबत काम करायला त्याला आवडेल.  
 
करण जौहरने सांगितले, कंगना बॉलीवूडमधील सर्वश्रेष्ठ नायिकांमधून एक आहे. या अगोदर देखील करण ने म्हटले होते की जर एखाद्या चित्रपटात त्याला कंगनासोबत काम करण्याची गरज भासली तर त्यात त्याला काही नवल नावटार नाही.  
 
उल्लेखनीय आहे की करणचाच चैट शो ‘कॉफी विद करण’मध्ये कंगना ने एकदा परत आपली हजेरी लावली होती तेथे तिने करणला नेपोटिज्म पसरवण्याच्या मुद्द्यावरून घेरले होते. तिचे म्हणणे होते की करण सारख्या निर्देशकांमुळे बॉलीवूडमध्ये नवीन आणि फ्रेश टॅलेंट जागा बनवू शकत नाही. त्यानंतर दोघांमध्ये या मुद्द्यावरून वाद विवाद सुरूच होते.  
प्रोफेशनल फ्रंटची गोष्ट केली तर करण जौहरचे चित्रपट कलंक लवकरच रिलीज होणार आहे. तसेच कंगना रनौट सध्या तिचे येणारे चित्रपट पंगाची शूटिंग करत आहे. पडद्यावर ती लवकरच फिल्म मेंटल है क्या मध्ये दिसणार आहे.