मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मार्च 2019 (17:15 IST)

पुणे मेट्रोच्या खोदकामात आढळली दोन इतिहासात लुप्त झालेली भुयारे

two tunnels found during Pune metro work
पुणे मेट्रोच्या कामादरम्यान स्वारगेट परिसरात 2 भुयारं आढळली असून, जमिनीखाली पक्क्या विटांचा उपयोग करुन यांच  बांधकाम करण्यात आले आहे. 

ही दोन  भुयारं कधी आणि कोणी , कोणत्या साली बांधली याची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. स्वारगेट परिसरातील राजर्षी शाहू महाराज बस स्थानकाच्या समोरील बाजूला पायलिंग मशीनद्वारे खोदकाम सुरु आहे,  त्याचवेळी बस स्थानकाची बाजू खचली आणि  असाच खड्डा त्याच्या दुसऱ्या बाजूला घेत असताना तेथेही मोठा खड्डा पडला.

त्यानंतर मेट्रोच्या अधिकाऱ्यांना पाहणी केली तर त्यात  पूर्व, पश्चिम दिशेसह उत्तरेकडे भुयार जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकारे  जमिनीखाली भुयारं सापडण्याची उदाहणं इतर ठिकाणीही देखील  पाहायला मिळालेली आहेत. त्यातील अनेक भुयारं ही अनेक वर्षांपूर्वी बांधली आहेत.

कालांतराने जमिनीखाली गेलेली ही भुयारं नव्या बांधकामाच्यावेळी सापडतात. आता ही भुयारे कोणी व कोणत्या साली बांधली याची माहिती इतिहास संशोधक घेणार आहेत. यामुळे इतिहासातील काही रंजक गोष्टी सुद्धा समोर येऊ शकतात.