शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

विद्यार्थिनीच्या मोबाईलमध्ये दहावीचा पेपर

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मुख्य परीक्षा सुरू असून, विद्यार्थ्यांचा समाजशास्त्र विषयाची परीक्षा होती. कॉपीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी भरारी पथक सर्व केंद्रांवर पूर्ण लक्ष देऊन आहेत. मात्र भिवंडी येथील शाळेत शिस्तीला गालबोट लागले आहे. 
 
शाळेत परीक्षार्थी म्हणून आलेल्या तीन विद्यार्थीनींना कॉपी करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. काल्हेर येथील शेतकरी उन्नती मंडळाच्या परशराम धोंडु टावरे विद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  पेपर सुरू  झाला  तरी तीन विद्यार्थीनी शाळेच्या बाहेर घुटमळत होत्या, तीन विद्यार्थीनी रिक्षात बसलेल्या आढळल्या. पेपरला सुरुवात झाली तरी परिक्षा केंद्रात येत नाही हे पाहून शिक्षिका विद्या पाटील यांना त्यांच्यावर संशय आला. शिक्षिका पाटील यांनी त्या संशयित विद्यार्थिनींची तपासणी  केली असता त्यांच्या मोबाईल मध्ये टॉपर्स ग्रूप या नावाने प्रश्नपत्रिका आढळून आली आहे. तपासणी केली असता त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा तोच प्रकार आढळून आला आहे . राहनाळ येथील होली मेरी काँन्व्हेंट शाळेच्या इंग्रजी माध्यमाच्या या विद्यार्थीनी आहेत. या गंभीर प्रकरणी आता पोलिस चौकशी सुरु झाली आहे.