रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 28 मार्च 2019 (17:01 IST)

सोमय्या यांची मातोश्री वर भेट नाकारली, अडचणी वाढल्या

ईशान्य मुंबईचे भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झाली आहे. स्थानिक शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या` संभाव्य उमेदवारीला जोरदार  विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सोमय्या यांची उमेदवारी जाणार हे निश्चित आहे त्यामुळे  किरीट सोमय्या यांनी ‘मातोश्री’चे दरवाजे ठोठावण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार किरीट सोमय्या यांना भेटण्यास नकार कळवला आहे.

खासदार किरीट सोमय्या हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार अनिल देसाई यांच्या माध्यमातून किरीट सोमय्या यांच्याकडून उद्धव ठाकरेंची मन वळवण्याचा  प्रयत्न करत आहेत.  मात्र संजय राऊतांनी भेट घेण्यास नकार दिला. नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले नगरसेवक प्रवीण छेडा हे सुद्धा किरीट सोमय्या यांची बाजू मांडण्यासाठी ‘मातोश्री’वर गेले होते मात्र त्यांना देखील यश आले नाही.एकंदरीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका करणाऱ्या किरीट सोमय्या यांना, त्यावेळीची टीका भोवण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता सोमय्या यांना उमेदवारी मिळणार नाही हे उघड झाले आहे.